वारीस नव्हे लावारीस; शिवसेना नेत्याची धमकी

Arjun Khotkar - Waris Pathan

मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे. वारीस पठाण हा वारीस नसून लावारीस आहे. तो भेटल्यावर त्याच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला .

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वारिस पठाण यांनी एका जाहीर सभेत बोलताना ‘आम्ही १५ कोटी १०० कोटींना भारी आहोत’ असे विधान केले होते. १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका सभेत पठाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. वारीस पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं, त्यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवीसी देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे.