विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले ; महाराष्ट्रातही तसंच होईल: संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) उत्सव हा देशात साजरा होतो आहे . शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महराजांनी स्वराज्य टिकवले . महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले .

न्याय कसा असावा हे सैन्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं. आज शेतकऱ्यांच्या पोटाला, देठाला, अस्तित्वाला धक्का लागतोय, ही परिस्थिती विकट आहे, असं राऊत म्हणाले.

शिवाजी महाराजांचा उत्सव हा देशात साजरा होतोय. शिवाजी महाराजांकडून संपूर्ण देश खरी प्रेरणा घेतोय. आपण त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो. निश्चयाचा महामेरू म्हणतो, महाराष्ट्राला इतिहास आहे, इतरांना भूगोल असेल… अशा शिवाजींचा जन्म इथे झाला हे महत्वाचे … ज्या शिवाजींच्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER