शिवसेना नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही परतणार ; काँग्रेसमध्ये होणार प्रवेश

Ranjitsinh Deshmukh - Congress

मुंबई : शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख (Ranjitsinh Deshmukh) स्वगृही काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार आहेत. मुंबईतील गांधी भवन या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या दिग्गज नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम होणार आहे.

रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकासकामं करत माण- खटाव तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची बांधणी घट्ट केली. 2003 च्या दुष्काळात सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता.

मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आपल्या राजकीय हितसंबधांचा उपयोग करून देशमुख यांनी गत दुष्काळात दोन्ही तालुक्यात सुमारे 70 चारा छावण्या सुरू करून दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा दिला होता. सिंचन योजनेद्वारे कातरखटाव परिसरात शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा जटील प्रश्न मार्गी लावला. परंतू काँग्रेस विचारधारेचा पगडा असलेले रणजितसिंह देशमुख काँग्रेस बाहेर फारसे रमले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER