ही ती वेळ नाही; तुमचं गलिच्छ राजकारण तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही – शिवसेना

shivsena leader nitin nandgaonkar criticised bjp maharashtra bacho agitation

मुंबई : भाजपाचे आज राज्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकारने भाजपावर जोरदार टीका केली आहे. मनसेनंतर आता शिवसेनेतून गरजूंना मदत करणारे दबंग नेता नितीन नांदगावकर यांनी भाजपाच्या आंदोलनावर कडवी टीका केली आहे.

कोरोनाच्या संकटकाळातही भाजपा आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. केंद्रातील सरकारला खूश करण्यासाठी भाजपाचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे नांदगावकर यांनी म्हटले आहे. तसेच, कोरोनाची साथ तेजीत असताना आंदोलनाच्या मार्गातून भाजपा आपल्या कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालत असल्याचे नांदगावकर यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा:- ‘कव्वे की चोंच मारने से पहाड नहीं तुटते’ राष्ट्रवादीची भाजपच्या आंदोलनावर टीका

भाजपाच्या आंदोलनामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते, पोलिसांवरील ताण वाढू शकतो. अनेक पोलीस कोरोनामुळे शहीद झाले आहेत. तसेच, माध्यमांतील अनेकांना कोरोना झाल्याची माहिती आहे. अशा स्थितीत माध्यमांना प्रसिद्धीसाठी भाजपाने परिपत्रक काढले आहे. तेव्हा माध्यम प्रतिनिधीचेही आयुष्य, त्यांच्या परिवाराचे स्वास्थ्य धोक्यात टाकण्याचे काम भाजपा करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते नांदगावकर यांनी केला आहे.

भाजपाला झालेली पोटदुखी अशा आंदोलनाने बसणार नाही आहे. एवढा जळफळाट कशासाठी? नेमके काय साध्य करायचे आहे भाजपाला? ही षडयंत्र रचण्याची वेळ नाही. कोरोनाने एकमेकांच्या सोबत काम करण्याची संधी दिली ती निदान गमावू नका. जनतेला सर्व काही दिसतंय. महाराष्ट्रातील जनता तुमचं गलिच्छ राजकारण तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपाच्या आंदोलनावर टीका केली आहे. तसेच, नांदगावकर यांनी जाहीर निषेधदेखील केला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला