शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितले आहे. तसंच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचं तसे च कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

शिंदे आपल्या ट्विट म्हणले की , काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती, असे ट्विट शिंदे यांनी केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER