शिवसेनेचा वकील मंत्री संजय राऊतांच्या भेटीला; ईडी नोटीसच्या कायदेशीर बाबींवर चर्चा

Anil Parab & sanjay Raut

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची  पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने (ED) पाठवलेल्या नोटिशीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) थेट राऊत यांच्या भेटीसाठी दैनिक ‘सामना’च्या कार्यालयात आले असून या दोघांमध्ये ईडीच्या नोटिशीवरून बंददाराआड चर्चा सुरू असल्याची माहिती आहे . ईडीची नोटीस आल्यामुळे संजय राऊत विरोधकांवर निशाणा साधत आहेत .

राऊत यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या दोघांमध्येही ईडीच्याच अनुषंगाने चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर आज राऊत हे बॅकफूटवर असलेले पाहायला मिळाले.

कालपर्यंत ईडीवर टीका करणारे राऊत आज ईडीचा आदर करत असल्याचं सांगत होते. दरम्यान, राऊत मुख्यमंत्री भेटीनंतर अनिल परब हे सामना कार्यालयात आले आहेत. परब हे पेशाने वकील असल्याने ईडीला काय उत्तर द्यायचं? याविषयीच्या कायदेशीर बाबींवर या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER