एकदा किरीट सोमय्यांच्या आरोपांची मालिका संपू द्या, दिवाळीनंतर आम्ही सुरू करू : शिवसेना

Anil Parab - Kirit Somaiya

मुंबई :- किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर एकदाचे काय ते सर्व आरोप करून घ्यावेत. दिवाळीनंतर शिवसेना त्यांच्यावर कोणते आरोप करते ते पाहाच आणि तेव्हा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देण्यास तयार राहावे, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी दिला. त्यामुळे आता शिवसेना किरीट सोमय्या यांच्याविरोधात नक्की कोणते सत्य समोर आणणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मी दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारच्या तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जनतेसमोर मांडणार, असे वचन दिले होते. ते वचन आज मी पूर्ण करत असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या या तीन कथित घोटाळ्यांमध्ये दहिसर भूखंड घोटाळा, ठाकरे आणि नाईक कुटुंबीय जमीन व्यवहार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी बनावट कागदपत्रांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (SRA) लाभ घेतल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. आपण आता या सगळ्या घोटाळ्यांविरोधात उच्च न्यायालय आणि लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : किरीट सोमय्यांनी केले आरोप ; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER