‘शिवसेना आंदोलन करूनच मोठी झाली मग आमच्या आंदोलनाला आक्षेप का? मराठा क्रांती मोर्चाचा उद्धव ठाकरेंना सवाल

Maratha Reservation-CM uddhav Thackeray

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मराठ समाज आक्रमक झाला असून त्यांनी अनेक ठिकाणी ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Govt) आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आज मुंबईत मोर्चा वळवला आहे. ठाकरे यांनी मराठा आरक्षणाकरता आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते . त्याला आता मराठा क्रांती मोर्चातर्फे उत्तर देण्यात आलं आहे. ‘शिवसेना आतापर्यंत आंदोलन करुनच मोठी झाली आहे. मग आम्ही आंदोलन करतोय तर त्याला आक्षेप का?’ असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विचारला आहे.

'शिवसेना आंदोलन करूनच मोठी झाली मग आम्ही पण आंदोलन करणार'मुंबईत दादर इथल्या प्लाझा थिएटरबाहेर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज ठिय्या आंदोलन सुरू आहे. सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईत आज 20-25 ठिकाणी आंदोलन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान ठाकरे सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने नसल्याची टीका करत मराठा समाज आणि विरोधकांकडून जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : मुंबईत मराठा समाज आक्रमक ; प्लाझा थिएटरबाहेर ठिय्या आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER