महाविकास आघाडीला पंढरपुरातील पराभव भोवणार ; शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर

Maharashtra Today

मुंबई : महाविकास आघाडीला पंढरपुरातील पराभवाचा मोठा फटका बसणार आहे . नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) भाजपच्या (BJP)वाटेवर असल्याची चर्चा आहे. नांदेडमधील देगलूरच्या पोटनिवडणुकीचं तिकीट न दिल्यास भाजपचा झेंडा हाती धरण्याचा अप्रत्यक्ष इशारा साबणेंनी दिला आहे.

नांदेडमधील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत .

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वर्गीय अंतापूरकर यांच्या मुलाला पोटनिवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं आहे.

दुसरीकडे माजी आमदार सुभाष साबणे यांनी प्रसंगी उमेदवारीसाठी भाजपात जायची तयारी ठेवली आहे. देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी साबणे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button