शिवसेनेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाईन फ्लूने निधन

download

ठाणे :- कल्याण-डोंबिवली   महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचं आज स्वाईन फ्लू या आजारानं निधन झालं. ठाण्याच्या खासगी रुग्णालयात आज (१० सप्टेंबर) दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कल्याणी  पाटील यांना मागच्या महिन्यात १४ ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लगेचच ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉक्टरांकडून शर्थीचे उपचारही सुरू होते. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. पण गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

कल्याणी पाटील २०१३ ते २०१५ या कालावधीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर होत्या. शिवसेनेकडून त्यांनी २०१४ ला  विधानसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यामध्ये त्यांना भाजपच्या उमेदवारांकडून पराभव पत्कारावा लागला होता.

ही बातमी पण वाचा : चिंबीपाडा आरोग्य केंद्रात तीन महिन्यापासून औषधेच नाही