शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही; काँग्रेस नेत्याची सोनिया गांधींकडे तक्रार

Ravi Raja & Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असली तरी सध्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेना दिलेला कोणताही शब्द पाळत नाही. काँग्रेसला कोणत्याही निर्णयात सामील करुन घेतले जात नाही. शिवसेनेकडून सर्व निर्णय एकहातीच घेतले जातात, असा आरोप पालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केला. याबाबतची तक्रार त्यांनी हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करुन दिली. मात्र, शिवसेना पालिकेतही दिलेला शब्द पाळत नाही. काँग्रेसला कोणत्याही निर्णयप्रक्रियेत सामील करून घेतले जात नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावरच लढवावी, असे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवल्याचे रवी राजा यांनी सांगितले आहे. आता रवी राजा यांनी व्यक्त केलेल्या परखड मतावर पक्षश्रेष्ठी कुठला निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी पण वाचा : सोनिया गांधींचे पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही; संजय राऊतांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 MT LIKE OUR PAGE FOOTER