मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच; काँग्रेसची मागणी शिवसेनेने नाकारली

Congress-Vinayak Raut

रत्नागिरी : मुंबई महापालिकेला दोन महापालिका आयुक्त देण्याची काँग्रेसची मागणी शिवसेनेने (Shivsena) नाकारली आहे . मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच, एकच आयुक्त पुरेसा आहे, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh ) यांनी मुंबई महापालिकेला दोन आयुक्त देण्याची मागणी केली होती . राऊत म्हणाले , मुंबई महापालिका हे एक क्षेत्र आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला एकच आयुक्त पुरेसा आहे. मुंबईचा कारभार एकछत्री व्हायचा असेल तर एकच आयुक्त योग्य आहे. मुंबईला दोन आयुक्त देण्याची गरज नाही, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. यापूर्वीही मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी झाली होती. त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ही संकल्पना आवडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेला दोन आयुक्त देण्याची मागणी म्हणजे मुंबईला तोडण्याचा घाट आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईला तोडण्याचा कोणीही प्रयत्न करू शकणार नाही, असे सांगतानाच मुंबईच्या हितासाठी एकच आयुक्त असणं कधीही योग्यच असल्याचे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER