बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवण्याची मागणी ; अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील

Bihar elections.jpg

मुंबई : बिहारमध्ये (Bihar elections) लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या तेथील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच महाराष्ट्रा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बिहार निवडणूक प्रभारी असल्याने उत्तर प्रदेस सोबत सोबत महाराष्ट्रासाठीही ही निवडणूक अधिक रंगतदार असेल असेच सध्याचे चित्र आहे. त्यातच बिहार येथील स्थानिक शिवसेना नेत्याने शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Vidhansabha Polls) लढवावी असा आग्रह धरला आहे. बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा मुंबईत येऊन संजय राऊत यांची भेट घेतली व शिवसेनेने बिहार निवडणुकीत सहभाग घ्यावा व 50 पेक्षा जास्त जागा लढवाव्या अशी विनंती बिहार शिवसैनिकाने राऊत यांच्याकडे केली आहे.

राऊत यांनी बिहारमधील पदाधिकाऱ्यांची मागणी ऐकून घेतली. अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राऊत यांनी नेत्यांना सांगितले.

बिहार विधानसभा निवडणूक शिवसेना याआधीही लढवत होती, त्यामुळे यावेळीही रिंगणात उतरण्याबाबत निर्णय घेऊ, असं संजय राऊत यांनी चार दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.

हौसलेंद्र शर्मा म्हणाले?

भूमिपुत्रांचा विकास आणि प्रखर राष्ट्रवाद हे मुद्दे घेऊन शिवसेनेची स्थापना झाली होती त्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल.आमचे भूमिपुत्र रोजगारासाठी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गेलेले आहेत. बिहार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन 50+ जागा लढवण्याची आग्रही मागणी केलीय. ती घेऊन आम्ही मुंबईत आलो आहोत. निर्णय पक्षप्रमुख घेतील. शिवसेना आपल्या विचारधारेपासून कधीही यूटर्न घेत नाही. जे या विचारधारेशी सहमत असतील ते आमच्यासोबत येऊ शकतात. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. शिवसेनेने 2015 मध्ये 88 जागा लढवल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER