शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा यंदा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार

शिवसेना - दसरा मेळावा

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शिवसेनेचा (Shiv Sena) शिवतीर्थावर होणार दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधनं कायम आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आला आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात दसरा मेळावा घेण्याचा प्रस्ताव पुढे आला.

दरम्यान राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही अंशी अनलॉक केलं असलं तरी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध अद्याप उठवलेले नाहीत. त्यामुळं सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधनं कायम आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. त्यानुसार मेळाव्याचं स्वरुप काय असावं? तो कसा घेतला जावा? यावर चर्चा सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER