राजकारण करण्यासाठी ‘घंटानाद’ आंदोलन : शिवसेनेचा आरोप

Ghantannad Andolan-Deepesh Mhatre

मुंबई : राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील भाजपाने (BJP) शनिवारी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ या आंदोलनाला (Ghantannad Andolan) सुरुवात केली. कल्याण-डोंबिवलीतदेखील भाजपा आमदारांनी मंदिराबाहेर आंदोलन केले. याबाबत शिवसेनेचे युवासेना नेते आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे (Deepesh Mhatre) यांनी डोंबिवली भाजपावर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा:- दारूच्या दुकानाबाबत आस्था दाखवता मग प्रार्थना स्थळाबद्दल का नाही : फडणवीस

कोरोना प्रादुर्भाव काळात जेव्हा कल्याण-डोंबिवलीत रुग्णांना बेड, आयसीओ, ऑक्सिजन मिळत नव्हते, जेव्हा नागरिकांना गरज होती तेव्हा ही मंडळी कुठे होती? फक्त राजकारण करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले गेले आहे, असा आरोप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER