शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साधेपणाने साजरा होणार ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Uddhav Thackeray & Balasaheb Thackeray

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) स्मृतिदिन साधेपणाने साजरा करणार असल्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे.

मंगळवारी १७ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. पण यंदा राज्यावर कोरोनाचा संकट आहे. त्यामुळे सगळे सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. याचमुळे बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कुटुंब हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. पण विभागातील शिवसैनिकांनी आणि विभागप्रमुख यांनी शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी जमू नये, असा आदेश देण्यात आला आहे.

शिवसेना भवनात अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील विभागप्रमुखांना यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER