
चंद्रपूर : काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याविरोधात निवडणूक लढलेले शिवसेना उमेदवार संदीप गड्डमवार (Sandeep Gaddamwar) यांनी काँग्रेसचा (Congress) झेंडा हाती धरला.
विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गड्डमवार हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक आहेत. ब्रह्मपुरी मतदारसंघातून २००९ मध्येही संदीप गड्डमवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र अवघ्या साडेपाच हजारांच्या मताधिक्याने भाजप उमेदवार अतुल देशकर यांनी निवडणूक जिंकली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला