दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले, सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदललले ; शिवसेनेच्या नेत्याची राणेंवर टीका

मुंबई :- भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आयत्या बिळावर नागोबा आहेत जिथे सत्ता तिथे ते. हिंदुत्वाचा विचार आणि तत्व अमित शहांनी (Amit Shah) ज्यांच्या व्यासपीठावरून मांडली त्यांनी सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी राणे आणि शहांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

नारायण राणेंच्या बाजुला बसलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारायला हवं होते की राणेंबाबत सभागृहात काय म्हटले होते ? नारायण राणेंनी भाजपला गुंडांचा पक्ष म्हटले होते . त्यावर फडणवीसांनी राणे कसे गुंड आहेत हे सांगितले होते . त्यामुळे दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले हे दिसले असल्याचे म्हणत सावंत यांनी फडणवीसांवरही टीकास्त्र सोडले.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचे भाजपला धक्क्यावर धक्के ; मुंबईतही भाजप नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

धमक्या देऊन माणसांना पक्षात घ्यायचं हेच भाजपचे काम असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी भाजपवर केला.

केंद्रीय मंत्रिमंडळात राणेंना घेतले तरी काय फरक पडणार नाही, कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचं उत्तर त्यांनाच द्यावे लागेल, असेही सावंत यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER