महापूरात मोडलेला संसार उभारायला शिवसेना धावली

Flood Kolhapur.jpg

कोल्हापूर :- पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन नद्यांनी पूररेषा ओलांडली आणि कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये महापूराने थैमान घातले. महापूर ओसरल्यानंचतर तर तेथे अजूनच गंभीर स्थिती निर्माण झाली. आतापर्यंतची सगळी कमाई या महापुरात वाहून गेली होती. पुन्हा नवा संसार ऊभं करण्याचं आव्हान या पूरग्रस्तांना असल्याचे पाहून राज्याच्या विविध ठिकानाहून मदतीचे हात पुढे आलेत. यामध्ये शिवसेनेने मोलाची कामगिरी बजावली आहे.

पुरामुळे शाळेचं दप्तर भिजलं म्हणून रडणाऱ्या कोल्हापूरमधील काव्यांजली कांबळे या चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली तर दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांकडून काव्यांजलीला वह्या-पुस्तकं देण्यात आली आहे. तर काव्यांजलीला शिवसेनेच्या वतीनं नवं घर बांधून देण्यात येणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून येथे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी केली जात आहे. वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि शिवसेना नेते रुपेश म्हात्रे यांनी काव्यांजलीच्या सिद्धार्थ नगर येथील घराला भेट दिली. यावेळी घराची झालेली पडझड पाहून काव्यांजलीला नवं घर बांधून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

shivsena

यासाठी रोख स्वरुपात 2 लाख रुपयांची मदतही म्हात्रे यांनी केली. तसेच, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ जे.बी. भोर यांनीही रोख 25 हजार रुपयांची मदत दिली आहे.