फडणवीसांच्या आभासी आकडेवारीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेची आज 4 वाजता पत्रकार परिषद

fadnavis-anil parab

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी चार वाजता ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊ अनिल परब यांची आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने राज्याला कशी, कुठे किती किती रुपयांची मदत केली. याचा संपूर्ण लेखाजोखा सादर केला. त्यानंतर, फडणवीसांच्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे नेते अनिल परबदेखील आज चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

ही बातमी पण वाचा:- सत्तांतराची आम्हाला घाई नाही, ते आपल्या कर्तृत्वानंच जातील…फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या आभासी आकड्यांची सत्यस्थिती सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचे परब यांनी सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा:- महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक

“शिवालय” शिवसेना जनसंपर्क कार्यालय नरीमन पॉईंट येथे ही पत्रकार परिषद होणार आहे. परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री तसेच शिवसेना प्रवक्ते श्री अनिल परब यांची आज बुधवार दिनांक 27 मे 2020 रोजी दुपारी 4 वाजता शिवालय येथे पत्रकार परिषद् आयोजीत करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER