मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवारांवर काँग्रेस नाराज ; कृषीविषयक विधेयकाला विरोध का केला नाही ? थोरातांचा सवाल

Uddhav Thackeray-Sharad Pawar-Balasaheb Thorat

मुंबई : राज्यसभेत कृषी विधेयकांवरून भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चांगला वाद पेटला आहे. आता त्याचे पडसाद महाविकास आघाडीमध्येही (MVA) पाहण्यास मिळत आहे. ‘शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना कृषीविषयक विधेयकाला विरोध का केला नाही याची विचारणा काँग्रेस करणार आहे. दोन दिवसांआधी दिल्लीत झालेल्या अधिवेशनात कृषीविषयक विधेयक मांडण्यात आले आणि मंजूर करण्यात आले. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गैरहजर होते. तर यावेळी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेनेने विरोध केला नाही. यावरून महाविकास आघाडीत मतभेत निर्माण झाले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. या विधेयकाला काँग्रेसचा विरोध कायम आहे. हे विधेयक शेतकरी वर्गाची मुंडी तोडणारे आहे तर व्यापार्‍यांना फायदा करणार्‍या विधेयकाला काँग्रेस विरोध करत आहे. पक्षांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी या विधेयकाला विरोध करणं गरजेचं आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे. ‘महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (Shivsena) यांनी या विधेयकाला विरोध का केला नाही याचे तेच उत्तर देतील.

काँग्रेस पक्षदेखील या संदर्भात विचारणा करेल. या विधेयकाबाबत विरोधातील आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडत आहे, असे सांगत थोरात यांनी नाराजी व्यक्त केली . सभागृहामध्ये बहुमताचा आकडा असल्याने हुकूमशाही पद्धतीने विधेयक केंद्र सरकार मंजूर करत असल्याची टीकादेखील थोरात यांनी यावेळी केली. दरम्यान, राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना गोंधळ घातला म्हणून आठ खासदारांना निलंबित करण्यात आले. या कारवाईच्या विरोधात रात्रीपासून संसद भवनात ठिय्या मांडला आहे.

ही बातमी पण वाचा : बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी शरद पवार यांच्याकडून इतिहासाची पुनरावृत्ती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER