जळगावात शिवसेनेची ताकद वाढली; महापौर निवडणुकीच्या काही तासांपूर्वी एक गट सेनेत

जळगाव :- जळगाव महापालिका (Jalgaon Municipal Corporation) महापौर निवडणुकीला (Mayoral election) आता काही तास उरले असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेनं जोरदार रणनीती आखात भाजपचे ३० नगरसेवक आपल्याकडे वळवले होते. पण आता निवडणुकीच्या काही तासांआधीच आणखी एक गट शिवसेनेत दाखल झाला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

जळगाव महापालिकेत आज ऑनलाईन पद्धतीने महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजपच्या ३० नगरसेवकांचा एक गट हा निवडणूक अगोदरच शिवसेनेला जाऊन मिळाला आहे. त्यामुळे आज जळगावात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर भाजपमधील बंडखोर उमेदवार उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. भाजपातर्फे महापौरपदासाठी प्रतिभा कापसे तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचा महापौर होण्याची पूर्णपणे खात्री आहे. कारण जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि खा. विनायक राऊत हे नेतृत्व करत असल्याची माहिती मिळाली असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पूर्ण ताकद लावून सत्ता काबीज करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहे.

ही बातमी पण वाचा : ‘मिर्झापूर असो की महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात’; मनसेकडून शिवसेनेवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER