पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव ; सभागृहात शिवसेना आक्रमक

Arnab Goswami-Anil Parab-Pratap Saranaik

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्याविरोधात शिवसेनेनं हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांनी हा प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव येताच शिवसेनेचे (Shivsena) सदस्य प्रचंड आक्रमक झाले.

अर्णब गोस्वामी हे सुपारीबाज पत्रकार आहेत, अशा शब्दांत  शिवसेनेने टीका केली आहे . विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी शिवसेनेने गोस्वामी यांच्यावर निशाणा साधला.परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनीही सरनाईक यांचे म्हणणे उचलून धरले. ‘अर्णब गोस्वामी हे स्वत: न्यायाधीश असल्यासारखे वागतात.

स्वत: खटला चालवतात आणि स्वत: निकाल देतात.’ असा संताप परब यांनी व्यक्त केला. तर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना गोस्वामी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘गोस्वामी हे जाणीवपूर्वक वाईट भाषा वापरून बोलतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणाशी कुठल्याही नेत्याचा संबंध नसताना कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी.’ अशी जोरदार मागणी सरनाईक यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER