मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे सडेतोड उत्तर

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या संकटमय काळात अनेक घटनाही घडल्या आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने पुन्हा एकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या या टीकेला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya-thackeray) यांनी उत्तर दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

कुठे दुर्घटना झाली की त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करत असते. तिथे पोलीस, मेडिकल टीम, प्रसारमाध्यमं काम करत असतात. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमच्यापैकी कोणीही तिथं गेलं की आमच्यामागे यंत्रणा उभी राहते. व्हीआयपी व्यक्तीने भेट दिली की तिथे काम करणारी सगळी यंत्रणा डायवर्ट होते. दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री, पालकमंत्री तिथे पोहोचून प्रत्येकाने जे काम करायचं असतं त्यासंबंधी सूचना देत असतात. खूप वेळा वॉररुममध्ये राहून सर्व कामकाज कसे सुरु असते हे पाहायचे असते आणि सध्या तेच अपेक्षित आहे, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले .

प्रत्येक जिल्ह्याचा एक पालकमंत्री असतो, तेथील काही ठराविक लोकप्रतिनिधी असतात. तिथे पोहोचून हवी ती मदत ते करत असतात. एकत्र काम केल्यानंतर प्रत्येकाने टीव्हीवर जाण्याची गरज नसते , असेही ते म्हणाले .

आपल्याच नाही तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून हे होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालून काम करायचे असते ते दोन्ही जागांवरील प्रमुख करत असतात,” असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “आम्ही गेल्यावर तिथे गोंधळ होतो. अर्धा पाऊण तास सगळं काही थांबलेलं असतं. आम्ही बाईट देत असतो, नंतर प्रसारमाध्यमं व्हीआयपी दौरा, टुरिझम अशी टीका करतात. सांत्वन फक्त टीव्हीवर येऊन करायचं नाही, तर कुटुंबाशी बोलून मदत कशी मिळेल हे पाहिले पाहिजे, असे आदित्य म्हणाले .

ही बातमी पण वाचा : लसीकरणावरून आता तरी राजकारण थांबवा; प्रवीण दरेकरांनी सरकारला केले लक्ष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button