शिवसेनेचे स्वप्न असलेले तारांगणचे काम रखडले

Shivsena

रत्नागिरी : शिवसेनेचे (Shivsena) स्वप्न असलेले शहरातील माळ नाका येथील स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तारांगण निर्धारित वेळेत पूर्ण होण्याच्या  आशा मावळल्या आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये हे काम पूर्ण करून देण्याची मुदत होती. परंतु, अद्याप ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे. शहराच्या माळ नाका येथील शहर मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक- ७१ मध्ये तारांगणचे बांधकाम सुरू झाले आहे.

निर्मल इन्फ्रास्ट्रक्चरकडून हे काम केले जात आहे. पाच  कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे हे तारांगण ऑक्टोबर २०२० मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. यातील स्थापत्य बांधकाम ३ कोटी ९३ लाख रुपये इतक्या खर्चाचे आहे. दोन वर्षांच्या मुदतीत हे काम पूर्ण करून देणे अपेक्षित होते. मात्र आता या कामाला २४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी मक्तेदार कंपनीकडून करण्यात आली. ही वाढीव मुदत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेने मंजूर केली आहे.

जिल्हास्तर नगरोत्थानमधून तारांगणचे काम सुरू असून, मक्तेदार कंपनीला आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आल्याचे रत्नागिरी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. लॉकडाऊनमुळे आणि त्यानंतर सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे तारांगणचा महत्त्वाचा डोम उभा राहू शकला नाही. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी हे काम परवडत नसल्याच्याही चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER