राज्याभिषेक सोहळा ऐकताना आणि आज त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो : जयंत पाटील

Maharashtra Today

मुंबई : हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांचा 348 वा राज्याभिषेक सोहळा (आज) रविवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil)यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .

रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती गाईड सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी ते सर्व ऐकताना अंगावर तेव्हाही काटा आला होता आणि आजही लिहितानाही येतो आहे असा अनुभव पाटील यांनी ट्विट करत सांगितला आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती असे सांगतानाच जयंत पाटील यांनी राज्याभिषेकानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button