रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात

आपल्याच गडातून म्हणजे घरातूनच शिवराज्यभिषेक साजरा करा

शिवराज्याभिषेक

रायगड : दरवर्षी प्रमाणे यंदाही रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळ्याला सुरूवात झाली आहे. एकचं धून सहा जून असं म्हणत दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटामुळे शिवराय मनामनात शिवराज्याभिषेक सोहळा मनामनात असे म्हणत यंदाचा शिवराज्यभिषेक आपल्या गडातून म्हणजे आपल्याच घरातून सोहळा साजरा करा असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले आहे. तसेच, आज शिवराज्यभिषेक सोहळ्याला गडावर सुरूवात झाली असून हा सोहळा लाईव्ह पाहता येणार असल्याचे संभाजीराजे यांनी ट्विट करून सांगितले आहे.

यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.