शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळाचा विस्तार; नवीन २८ मंत्र्यांची शपथ

Shivraj Singh Chouhans-new-cabinet-expansion

भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी राजभवनात एकूण २८ नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये २० कॅबिनेट मंत्री, ८ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. गोपाळ भार्गव, विजय शहा, यशोधराराजे शिंदे असे अनेक बडे चेहरे शिवराजसिंह सरकारच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. मात्र या २८ पैकी १२ मंत्री ज्योतिरादित्य शिंदे गटाचे असल्याने त्यांचा दबदबा पाहायला मिळणार आहे.

शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी
गोपाळ भार्गव, विजय शहा, जगदीश देवरा, बिसालाल, यशोधराज सिंधिया, भूपेंद्र सिंह, एडलसिंग कानशाना, ब्रिजेंद्र प्रताप सिंह, विश्वास सारंग, इम्रती देवी, प्रभूराम चौधरी, डॉ. महेंद्रसिंग सिसोदिया, प्रद्युम्नसिंग तोमर, प्रेमसिंह बघेल, प्रेमसिंह पटेल, ओमप्रकाश सकलेचा, उषा ठाकूर, अरविंद्रसिंग भदोरिया, मोहन यादव भदोरिया, हरदीपसिंग सेन, राजवर्धनसिंग ओथ, भरतसिंग इंदरसिंग परमार, राम खिलवान पटेल, राम किशोर कानवे, ब्रिजेंद्रसिंग यादव, गिरराज दंडौतिया, सुरेश धाकड, ओपीएस भदोरिया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER