शिवराय, महाराष्ट्र फक्त शिवसेनेचेच आहेत का? गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी- संजय राऊत

Sanjay Raut - Anil Deshmukh

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकिस्तान (Pakistan) व्याप्त भागाशी केली. तिच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (Shiv Sena) अधिकच आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सतत कंगनावर निशाणा साधत आहेत. आजही त्यांनी या मुद्द्याला हात घालून थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उचलून धरली.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्याशी व्यक्तिगत भांडण नाही. कंगनानं स्वतःचं ट्विटर हँडल स्वतः वापरावं. राजकीय पक्षांना ट्विटर हँडल चालवण्यास देऊ नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा हा महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवावं. शिवराय, महाराष्ट्र फक्त शिवसेनेचा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत मुंबईसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यायला हवं. गृहमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER