शिवभक्तांच्या साक्षीने शिवनेरीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला

CM Uddhav Thackeray - Ajit Pawar - ShivNeri

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने २३ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली.

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात जल्लोष; शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा

अजित पवार म्हणाले, “पहिल्यांदाच एवढा उत्साह शिवभक्तांचा दिसत आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने उत्साहाने आले आहेत. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आले आहे असं वाटत आहे. इथे आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी काही कामांची माहिती दिली. तातडीचे २३ कोटी रुपये आवश्यक असल्याचं सांगितलं. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असता, उद्धव ठाकरेंनीही तातडीने २३ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले” अशी माहिती त्यांनी दिली. शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आजच्या आज 23 कोटी मंजूर केले. चार विभागांना विभागून 23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वन विभाग, पुरातन विभाग, पीडब्ल्यूडीला 23 कोटी रुपये पाहिजे, ते दिले जातील”, इतिहास कालीन किल्ल्यांना हेरीटेज टच देऊन काम करण्याचा प्रयत्न आहे. ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या पूर्ण केल्या जातील. खाली वस्तू संग्रहालय करण्याचासुद्धा सकारात्मक विचार केला जाईल. असं अजित पवारांनी सांगितलं.

सरकारमध्ये मतभेद वगैरे असं काही नाही. सामंजस्य भूमिका घेऊन देश पातळीवर ज्या समस्या उद्भवतात त्या समस्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये, ही आमची भूमिका आहे. जातीय सलोखा रहावा सर्व प्रश्न शांतीने सुटावेत, हे प्रयत्न राज्याच्या प्रमुखांचे आहेत. आपला माणूस मुख्यमंत्री झाला अशी लोकभावना आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पण हीच भूमिका आहे. महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. सगळे प्रश्न आम्ही समन्वयाने सोडवू. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते. मात्र आम्ही पहिले आमच्या किमान समान कार्यक्रमाला बांधील आहोत. तसेच मराठा आरक्षण आंदोलनात नियमाच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीत राहून शासकीय मालमत्तेचे नुकसान केलं नाही असे गुन्हे मागे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.