‘छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा’; सचिन तेंडुलकरचं खास ट्विट

Sachin Tendulkar

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्सहाने साजरी होत आहे. यापार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील ट्विट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने ट्विट करत म्हटले की, प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ना मानाचा मुजरा करत शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सचिनने शुभेच्छा दिल्या आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंतीमहाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी केली जातो.