‘शिवनेरी’ किल्ल्यावर उद्या शिवजयंती सोहळा; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

पुणे :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर उद्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा शासकीय सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

महाराष्ट्रात एनआरसी लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्या सकाळी ६ वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याहस्ते शिवाई देवाची महापूजा होणार असून, सकाळी साडेनऊ वाजता शिवजन्माचा पाळणा होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवर मंडळी अभिवादन करतील. शिवजयंतीनिमित्त हजारो शिवप्रेमी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ‘शिवनेरी’वर येत असतात, हे येथे उल्लेखनीय.