दहा दिवस होणार ‘शिवजागर’

Keshav Upadhye

मुंबई :- भाजपा प्रदेश सांस्कृतिक सेलच्यावतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा समारोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभर ‘शिवजागर’ होईल, अशी माहिती भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केशव उपाध्ये यांनी सांगितले की, ही स्पर्धा राज्यातील ४० ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेत १५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील. मात्र परीक्षण स्वतंत्रपणे होणार आहे. “शिवगान स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ओवी, आरती, पाळणा, पोवाडा, स्फूर्तिगीत” यांचे सादरीकरण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर पहिले तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रथम क्रमांकाला अंतिम स्पर्धेसाठी सातारा येथे सहभागी होता येईल. ही स्पर्धा विनामूल्य आहे. स्पर्धेत कोरोनासंबंधी नियमांचे पालन केले जाईल, असे सेलचे प्रदेश संयोजक ॲड.शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER