शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भेटीची चर्चा रंगली

सातारा : खासदार उदयनराजे (Udayan Raje) आणि आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje) यांची साताऱ्यात भेट झाली. दोन राजांच्या भेटीची चर्चा रंगली.

खासदार उदयनराजे भोसले यांचे नाशिक येथे असलेले नातेवाईकांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या सुरुची या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट घरगुती असून या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात खा. उदयनराजे यांनी जिल्हा बँक निवडणुकीबाबत मी माझ्यापुरत बोलू शकतो. फलटणचे राजे, सातारचे राजे व लोकशाहीचे राजे याबाबत काळ व वेळ सांगेलच. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात ना. शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा झाली आहे. जिल्हा बँक आली म्हणजेच थोडंतरी होणारंच, अशी गुगलीही खा. उदयनराजेंनी यांनी टाकली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER