फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल : शिवेंद्रराजे

Shivendraraje Bhosale-Devendra Fadnavis

सातारा :- आज साताऱ्यात आण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. या फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) एकाच मंचावर उपस्थित होते. बऱ्याच दिवसांनंतर हे दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लागलं होतं.

यावेळी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं. कुणी मान्य करा अथवा नका करू. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं; पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय. आण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे कार्य हे मराठा समाज एकत्र आणण्यासाठी होणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नरेंद्र पाटील यांना आपण साथ दिली पाहिजे, असं शिवेंद्रराजे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावंच लागेल.

फडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते न्यायालयातही टिकवलं होतं. नंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण मात्र महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला ते टिकवता आलं नाही. राज्य सरकार जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला आडकाठी घालण्याचं काम करत आहे. आरक्षणावरून टोलवाटोलवी सुरू आहे. खरं तर याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपल्यात एकी नाही, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा प्रश्न… 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER