शिवेंद्रराजे अजित पवारांच्या भेटीला, चर्चेला उधाण

Shivendraraje-Bhosle-Ajit-Pawar

पुणे : साताराचे भाजप (BJP) आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje) यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती.

दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER