महाराष्ट्राच्या सातबारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? संजय राऊतांचा संतप्त सवाल

Sanjay-Raut

मुंबई : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या (kanjurmarg metro-carshed) जागेवर केंद्राने दावा केल्याने सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार वादंग पेटले आहे. राज्य सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्राने जागेवर दावा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

यानंतर राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली . यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्राच्या सातबारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा संतप्त सवाल विचारला आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्राच्या सातबारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे.

मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने उधळून लावूया. जय महाराष्ट्र, असे ट्विट त्यांनी केले आहे . दरम्यान कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३च्या कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथील कारशेडचे काम थांबविण्याची सूचना केंद्राने राज्य सरकारला पत्राद्वारे केली होती.

ही बातमी पण वाचा : मेट्रो कारशेडवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER