शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा ; छगन भुजबळांची माहिती

Shivbhojan Thali-Chhagan Bhujbal

मुंबई :- राज्यातील गोरगरीब, मजुर, शेतकरी, कामगार, विद्यार्थी कोणीही उपाशी राहू नये यासाठी सूरू करण्यात आलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची महत्वकांक्षी योजना असलेली शिवभोजन थाळीने आज ४ कोटींचा टप्पा पार केला आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून ४ कोटी लोकांना आम्ही जेवण देऊ शकलो याचा मला आनंद आहे. संकटाच्या काळात शिवभोजन थाळी जनतेला मोठा आधार देत आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीने थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून (Uddhva Thackeray) १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यादरम्यान शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्बंधात १५ दिवसांची वाढ केल्यानंतर आता शिवभोजन थाळीही पुढचे २ महिने मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button