शिवानी होणार बोल्ड

Shivani Sonar

कॉटनच्या साड्या, पारंपरिक दागिने आणि अंबाडा अशा ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसणारी शिवानी सोनार (Shivani Sonar) ही ‘राजा-राणीची ग जोडी’ या मालिकेमध्ये चांगलीच भाव खाऊन जात आहे. मात्र आता लवकरच शिवानी बोल्ड अंदाजामध्ये तिच्या चाहत्यांना दर्शन देणार आहे. सध्या शिवानी ‘राजा-राणीची ग जोडी’ या मालिकेमध्ये आहे. शिवानी म्हणजेच पडद्यावरची संजीवनी ढाले पाटील यांच्या घरातून कायमची निघून जाणार असल्याने कदाचित चाहत्यांना असं वाटत असेल की ती नव्या रूपात रणजितसमोर येणार का?

मात्र तसे नसून लवकरच ती एका नव्या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे आणि या वेबसिरीजमधली तिची भूमिका ही बोल्ड अंदाजातली आहे. त्यामुळे ‘राजा-राणीची ग जोडी’ या मालिकेमध्ये पारंपरिक लूकपेक्षा हटके लूकमध्ये शिवानीला पाहण्यासाठी तिचे चाहते फारच आतुर झाले आहेत. अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवलेली ‘राजा-राणीची ग जोडी’ या मालिकेत शिवानी सोनार ही संजीवनी ढाले पाटील ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

या मालिकेच्या माध्यमातून शिवानीने तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अत्यंत सुरेख अभिनय करत असल्याची पावती तिला चाहत्यांकडून तिच्या सोशल मीडियावर कमेंटमधून मिळत असते. शिवाय ‘राजा- राणीची ग जोडी’ या मालिकेच्या सेटवरची धमालदेखील शिवानी तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टा पेजवर, “मी लवकरच दिसणार नव्या रूपात” असे कॅप्शन असलेला फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये अशी उत्सुकता आहे की, आता असेही रणजित आणि तिच्या नात्यांमध्ये फूट पडल्याने तिला ढाले पाटलांचे घर सोडावे लागणार आहे आणि म्हणून तिचा लूक बदलला जाणार आहे का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू होती.

मात्र शिवानी सोनारला याच मालिकेच्या अभिनयाची पावती म्हणून एक नवी वेबसिरीज मिळाली आहे. शिवानी सांगते, ‘वन बाय टू’ या नावाची वेब सिरीज करशील का, अशी ऑफर मला आली. सध्या वेबसिरीज हे खूप पसंती असलेलं मनोरंजनाचं माध्यम आहे. प्रत्येकाच्या हातात इंटरनेट असल्यामुळे या माध्यमावर प्रसारित होणारे शो करण्यासाठी या पिढीचे अनेक कलाकार उत्सुक असतात. त्यामुळे जेव्हा ‘वन बाय टू’ करण्याची संधी माझ्याकडे आली तेव्हा मी ती नाकारू शकत नव्हते; शिवाय सध्या मी ‘राजा-राणीची ग जोडी’ या मालिकेत करत असलेली भूमिका आणि ‘वन बाय टू’ या वेबसिरीजमध्ये मला करायला मिळणारी भूमिका या दोन्ही भूमिकांमध्ये प्रचंड वेगळेपण असल्यामुळे पारंपरिक रूपात दिसणारी संजीवनी आणि एकदम बोल्ड रूपात शिवानी यापैकी प्रेक्षकांना कुठली शिवानी आवडते हे जाणून घेण्याचीदेखील मला उत्सुकता होती. म्हणूनच ही वेबसिरीज करायचं ठरवलं.

‘राजा-राणीची ग जोडी’ या मालिकेमधल्या भूमिकेबरोबरच या मालिकेतील संजीवनीच्या तोंडी असलेली भाषादेखील थोडीशी कोल्हापूर स्टाईलची आहे. त्यामुळे ही मालिका करताना शिवानीला खूप मजा आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेमध्ये लक्ष्मी नावाची छोटीशी व्यक्तिरेखा साकारली होती .

त्यानंतर नायिका म्हणून ‘राजा-राणीची ग जोडी’ ही पहिलीच मालिका तिला मिळाली आणि या संधीचे शिवानीने सोने केले आहे. मध्यंतरी शिवानीने एक खूप छान आठवण शेअर केली होती. तिच्या आईला मेहंदी आर्टिस्ट होण्याची खूप इच्छा होती, मात्र काही कारणाने तिला ते शिकता आलं नाही . पण आईचे ते स्वप्न शिवानीने पूर्ण केले. ती मेहंदी शिकली आणि प्रोफेशनल मेहंदी ऑर्डर घ्यायला लागली. तेव्हा आईला सोबत घेऊन जात होती.

आणि आईचे अपूर्ण स्वप्न तिने पूर्ण करून दिले. ही आठवणदेखील शिवानीने सांगितली होती. तेव्हा तिच्या चाहत्यांचा कौतुकाचा वर्षावदेखील झाला होता. शिवानी स्वतःदेखील एक मेकअप आर्टिस्ट आहे.

‘वन बाय टू’ या वेबसिरीजमध्ये ती श्रेयस गुजर याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे आता रणजित ढाले पाटील म्हणजेच मणिराज पवार यांच्यासोबत जशी तिची मालिकेत केमिस्ट्री जुळली आहे तीच केमिस्ट्री वेबसिरीजच्या पडद्यावर श्रेयससोबत जुळते का नाही हे पाहण्यासाठीदेखील तिचे चाहते ही वेबसिरीज रिलीज होण्याची वाट पाहात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER