शिवाजी विद्यापीठ कुलगुरुपदासाठी रस्सीखेच

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरुपदाच्या निवडीची प्रक्रिय सुरू झाली आहे. कुलगुरुपदासाठी नामवंत विषयाचे प्रोफेसर, प्राचार्य, अधिष्ठाता, प्रकुलगुरू या पदावर काम केलेल्या व्यक्तींनी अर्ज केले आहेत. शिवाजी विद्यापीठातीलच तब्बल १४ प्रोफेसरांनी कुलगुरुपदासाठी फिल्डिंग लावली आहे.

कुलगुरुपदासाठी १० जुलैपर्यंत अर्जांची प्रत सादर करण्याची मुदत आहे. त्यानंतर कुलपती नियुक्ती त्रिसदस्यीय समिती अर्जांची छाननी होणार आहे. त्यापैकी पाच पात्र नावांची राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे शिफारस होईल. त्या पाच उमेदवारांच्या मुलाखतीनंतर शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. दिलीप पाटील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. आर. व्ही. शेजवळ, सोलापूर विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इतिहासाचे प्रोफेसर डॉ. उमेश कदम, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसचे प्रोफेसर डॉ. अरुण खरात यांनी कुलगुरुपदासाठी २ जुलै रोजी ऑनलाईन अर्ज केले आहेत. संशोधन, अध्यापन व प्रशासकीय कामकाजाचा अनुभव, आंतराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंधांचे प्रकाशन आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांची संख्या ही बाब निवडीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER