शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार ऑनलाइन

Shivaji University Kolhapur

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) निर्णयानुसार पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षा (final session exams) घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठात बैठका सुरु आहेत. परीक्षा व मूल्यमापन मंडळ, आणि अधिष्ठाता मंडळाच्या झालेल्या बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन (Online Exams) पध्दतीने घेण्याची शिफारस करण्यात आली.

यावर आज (7 सप्टेंबर) होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली आहे.

राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत शिवाजी विद्यापीठाच्या पदवी अंतिम सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात शिफारशी केल्या आहेत. यासंदर्भात प्रस्ताव तयार करून आज विद्या परिषदेसमोर मांडला जाणार आहे. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि अधिष्ठाता मंडळाची बैठक झाली. या बैठकीत प्राचार्य डी. जी. कणसे यांच्या समितीने महाविद्यालय पातळीवरील परीक्षेच्या अनुषंगाने शिफारशी मांडल्या. या शिफारशींवर द्यालेल्या चर्चेअंती महाविद्यालयांनी online परीक्षेचे नियोजन करण्याचे ठरले आहे, याबाबत आज आदेश निघणारा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER