शिवाजी पार्क मैदानाचे नाव बदलले, ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ ची पाटी लागली

Chhatrapati Shivaji Maharaj Park

मुंबई : दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क यापुढे ‘छत्रपती शिवाजी महाराज मैदान’ म्हणून ओळखले जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून या मैदानात नव्या नावाची पती लावण्यात आली.

या मैदानाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मार्चमध्ये महापालिका सभेत मंजूर करण्यात आला होता. (Shivaji Park Ground Name Plate Change) मुंबईतील दादरची ओळख असणाऱ्या ‘शिवाजी पार्क मैदाना’चे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Chhatrapati Shivaji Maharaj Park) असे करण्यात आले आहे. या नामविस्ताराचा प्रस्ताव मार्चमध्ये महापालिका सभेत मंजूर करण्यात आला होता. तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्कचे नाव बदलण्यात आले.

ऐतिहासिक महत्त्व

या मैदानात अनेक राजकीय सभा पार पडतात. हे मैदान क्रिकेटसाठीही प्रसिद्ध आहे. या मैदानात अनेक क्रिकेटपटू घडले आहेत. मूळ ‘माहीम पार्क’ अशी ओळख असणाऱ्या या उद्यानाचे १० मे १९२७ रोजी ‘शिवाजी पार्क’ नामकरण करण्यात आले होते. १९६६ मध्ये या मैदानात लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मार्चमध्ये महासभेत या मैदानाचा नामविस्तार करण्याचा ठराव मांडला.

या प्रस्तावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठरावाला मंजूरी दिली. आज पालिकेने शिवाजी पार्क मैदानाच्या नावाची पाटी बदलून छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशी अधिकृत पाटी लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER