ठाणे पालिका मुख्यालयातील शिवाजी महाराजांच्या शिल्पच्या दुरुस्तीवरून महापौर दालनामध्ये राडा

महापौर , सभागृह नेते आणि समाजच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

Thane Shivaji Maharaj

ठाणे ( प्रतिनिधी ) :- ठाणे पालिका मुख्यालयामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराच्या चित्रशिल्पाच्या दुरुस्तीसाठी निवेदन घेऊन आलेल्या मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि महापौरांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तीन वर्ष दुरुस्तीसाठी पाठपुरावा करूनही शिल्पाची दुरुस्ती होत नसल्याने निधी गोळा करून मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी हा निधेची चेक तसेच चिल्लर महापौरांना देऊ केल्याने सभागृह नेते आणि महापौर कमालीचे संतप्त झाले. शिल्पाची दुरुस्ती ही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे झाली असून हिम्मत असेल तर ही चिल्लर आयुक्तांना देऊन दाखवा असे आव्हान सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना केले. हा वाद इतका टोकाला गेला कि प्रकरण हमरीतुमरीवर आले. अखेर रागाच्या भरात सखल मराठा समाजाचे समन्वयक कैलाश म्हापदी यांनी आणलेला धनादेश महापौरांच्या दालनामध्येच म्हापदी यांनी फाडून टाकत सर्व मंडळीं अखेर आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेले.

ही बातमी पण वाचा : एका ठरावाचे दोन ठराव करुन संपूर्ण शैक्षणिक भुखंडच खाजगी ट्रस्टच्या घशात घालण्याचा प्रताप

ठाणे महापालिका मुख्यलयात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबाराचे शिल्प हे फार वर्षांपासून आहे. या शिल्पाची दुरुस्ती व्हावी यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सकल मराठा समाज यांच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अजूनही या शिल्पाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. पालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून यापूर्वी निवेदने देखील देण्यात आली होती. त्यानंतरही प्रशासकीय स्तरावरून काहीच हालचाली झाल्या नसल्याने अखेर सकल मराठा समाजाच्या वतीने महापौरांना निवेदन देण्यासाठी महापौर दालनात समाजचे पदाधिकारी आले. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के देखील महापौर दालनांत उपस्थित होते. मात्र समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी २१ हजारांच्या चेक बरोबर काही काही चिल्लर महापौरांना देण्यासाठी आणल्याची कुणकुण महापौर मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांना लागल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. दिरंगाई प्रशासनामुळे झाली असून हिम्मत असेल तर आयुक्तांकडे जाऊन दाखवा असे आव्हान म्हस्के यांनी केले. तर माझ्या दालनात असे स्टंट करू नका असे खडे बोलच महापौरांनी सुनावल्याने वातावरण अधिकच तापले. अखेर समन्वयक कैलास म्हापदी यांनी धनादेश दालनामध्येच फाडल्याने नरेश म्हस्के आणि कैलाश म्हापदी यांच्यात चांगलीच चकमक उडाली.

महापौरांच्या दालनामध्ये हा संपूर्ण राडा झाल्यानंतर मराठा समाजच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे जाऊन हे निवेदन दिले. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देखील दोन दिवसांत शिल्पाचे काम सुरु करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र या शिल्पाच्या दुरुस्तीमुळे मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात महापौर आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये झालेल्या वादंगामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

  • अशा प्रकारे स्टंटबाजी करणे योग्य नाही –

अशा प्रकारे कार्यालयात येऊन स्टंटबाजी करणे योग्य नव्हते. शिल्पाच्या दुरुस्तीसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. तसे आदेशाही प्रशासनाला दिले होते. मात्र प्रशासनाकडून ही दिरंगाई झाली आहे. त्यामुळे त्यांना यासंदर्भात निवेदन देणे आवश्यक होते. अशा प्रकारे महिला महापौरांच्या दालनात चिल्लर देणे योग्य नाही.
मीनाक्षी शिंदे , महापौर, ठा.म.पा

  • मराठा समाजाची ताकद निवडणुकीत दाखवून देऊ – 
    महापौर हा जवळचा पालक असतो. गेली तीन वर्ष दुरु स्तीची मागणी करत आहोत. जर या शिल्पाचे उद्या काय  झाले तर मोठा वादंग निर्माण होऊ शकतो. हे सांगायला आम्ही गेलो होतो. निवेदन द्यायला आलेल्यांवर अंगावर धावून जाणो सभागृह नेत्यांची ही भूमिका योग्य नाही. आम्ही चिल्लर देणार नव्हतो तर चेक देणार होतो. अशी वर्गणी जमा केली, कारण शिल्पाच्या दुरु स्तीकडे महापालिकेकडे पैसे नाहीत. मात्र आता मत मागताना राजकर्ते दारावर आले तर त्यांना मराठा समाजाची काय ताकद आहे ते निवडणुकीमध्ये दाखवून देऊ .
     कैलास म्हापदी, समन्वयक, सकल मराठा समाज , ठा.म.पा

    या शिल्पाच्या दुरु स्तीसाठी आम्ही देखील पाठपुरावा करत आहोत. केवळ अधिका:यांच्या मतभेदामुळे दुरुस्तीची निविदा निघू शकली नाही. मात्र अशा प्रकारे महिला महापौरांना चिल्लर देणो हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीत बसत नाही. मी सुद्धा मराठा आहे मात्र अशी वर्तणूक मराठा समाजच्या पदाधिका:यांनी करणो योग्य नाही.
      – नरेश म्हस्के , सभागृह नेते, ठा.म. पा  

  • दोन दिवसात काम सुरु  करण्यात येईल – 
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाच्या दुरु स्तीचे काम करण्यासाठी 1क् लाखांच्या निधीची तरतूद करण्यात येईल. येत्या दोन ते तीन दिवसात या शिल्पाचे काम सुरु   करण्यात येईल.
    संजीव जयस्वाल, आयुक्त, ठा.म. पा