पवारांवर टीका करणारे शिवाजी कर्डिले दुसरे नारायण राणे झालेत ; शिवसेना-राष्ट्रवादीचा घणाघात

Shivaji Kardile - Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) याना शिवसेना (Shiv Sena) संपवायची आहे, असा आरोप भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांनी केले .यावरून शिवसेना-राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघात केला . कर्डिले यांनी शिवसेनेची नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी. आमदारकी गेल्यापासून कर्डिले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. शिवाजी कर्डिले दुसरे नारायण राणे (Narayan Rane) झालेत, असा पलटवार नगर तालुका शिवसेना व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री कर्डिले यांच्यावर केला आहे.

शिवसेनेचे नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, गोविंद मोकाटे व राष्ट्रवादीचे केशव बेरड यांनी कर्डिले यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांनी मिळूनच कर्डिले यांचा राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पराभव केला. विधानसभेला पराभूत झाल्यामुळे कर्डिलेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

कर्डिले यांना कोणी विचारत नसून त्यांचे राजकारण संपुष्टात आले आहे. कर्डिले यांनी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी शिवसेनेची नाही. आजवर शिवसेना साथ देत होती, म्हणूनच तुम्ही आमदार होत होतात. यावेळी साथ दिली नाही तर तुम्ही पराभूत झालात असे शिवसेना व राष्ट्रवादीने कर्डिलेंना सुनावले आहे.

तसेच कर्डिले अजून पराभवाच्या धक्क्यातून सावरले नसल्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्ये येत आहेत. आपली पेपरला बातमी यावी यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER