…मग शिवाजी कर्डिलेंनी रात्रीच्या अंधारात अजित पवारांचे पाय का धरले?

अहमदनगर :- शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या अहमदनगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये विद्यमान संचालक मंडळाने सुमारे ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार स्वच्छ असल्याचा गवगवा बाजार समिती सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. बाजार समितीचा कारभार स्वच्छ आहे तर, मग माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी रात्रीच्या अंधारात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पाय का धरले, असा प्रश्न अहमदनगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदेश कार्ले म्हणाले की, नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनधिकृत बांधकामे, गाळेवाटप, मोकळ्या जागा वाटप, बेकायदेशीररीत्या केलेला दैनंदिन खर्च या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये विद्यमान संचालक मंडळाने सुमारे ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला आहे. तरीदेखील समितीचा कारभार स्वच्छ असल्याचा गवगवा बाजार समिती सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. जर बाजार समितीचा कारभार एवढा पारदर्शक आहे तर शिवाजी कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंधारात पाय का धरले, असा प्रश्न कार्ले यांनी केला आहे.

तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धवराव दुसुुंगे म्हणाले की, बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू असून मतदारांनी चोरांच्या हातात बाजार समिती दिली. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम माजी आमदार कर्डिले यांनी केले.

ही बातमी पण वाचा : ए मास्क लाव रे; जेव्हा अजितदादांचा सरकारी कर्मचाऱ्याला फटकारले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER