छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो ‘संपला’ !

ncp-leader-chhagan-bhujbal-attacks-BJP

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जो गेला तो संपला असे म्हटले जायचे . याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे . भुजबळांवर सतत राजकीय आरोप करणारे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, शिवसेना नेते शिवाजी चुंभळे यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.

मागील अडीच वर्षे सभापती असलेले चुंभळे पोलिस तक्रारी, संचालकांसह कर्मचाऱ्यांबरोबर मारामाऱ्यांमुळे सतत वादग्रस्त ठरले होते.राज्यातील आघाडीच्या मानल्या गेलेल्या नाशिक बाजार समितीच्या संचालकांनी शिवाजी चुंभळे यांच्या विरोधात बंड पुकारले होते. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने चुंभळेना पायउतार व्हावे लागले. अविश्वासाचा ठरावासाठी मतदान होणार असल्याने बाजार समितीच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर ही प्रक्रिया पार पडली आहे.

दरम्यान चुंभळे व त्यांच्या निकटवर्तीयांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अप्रत्यक्षपणे त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्वच नाराज संचालक एकत्र आल्याने काल अविश्वास ठराव मांडण्यात आला.त्या ठरावावेळी ते तिकडे फिरकलेही नाही.

एल्गार परिषद प्रकरणी शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता; लवकरच येणार समन्स