उत्तर प्रदेश, नेपाळमध्येही शिवजयंती साजरी

Shiv Jayanti

लखनौ : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी साजरी झाली. नेपाळमध्येही शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्यात आली. उत्तर प्रदेशात मराठी समाज (Marathi Community) संघटनेने राजधानी लखनौ (Lucknow)मध्ये शिवजयंती साजरी केली. उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, नगरविकास मंत्री आशुतोष टंडन, महापौर संयुक्त भाटिया, कुलपती अलोककुमार रॉय, वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, माजी कुलपती संजय देशमुख, नामदेवराव जाधव, हरिभाऊ बोरीकर, सुनीलकुमार लवटे, कोषाध्यक्ष गजानन पाटील, महामंत्री पांडुरंग राऊत, प्रदीप गायकवाड, आनंदराव देवकर, मनोहर फडतरे, अक्षय देशमुख, सूरज देवकर व इतर मोठ्या संख्येत उपस्थित होते.

नेपाळमधील (Nepal) दलदले या गावात छत्रपती उदयनराजे भोसले विकास संस्था व मराठी समाजबांधवांनी शिवजयंती साजरी केली. संघटनेच्या संस्थापक स्वाती बगाडे, नेपाळ शाखाप्रमुख दीपिका शिंगाडे, उत्तर भारत संघटक विठ्ठल शिंगाडे, युवा आघाडीप्रमुख दीपिका सापकोटा, सुहास भोसले, भरत मगर, भारतीय व नेपाळी नागरिक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER