पन्हाळगडावर वृक्षारोपणाने साजरी शिवजयंती : दत्तक झाडांचे वाटप अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते होणार

Sayaji Shinde

कोल्हापूर :- शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रतर्फे पन्हाळगडावर यंदाची ३९१ वी शिवजयंती ३९१ देशी झाडे लावून साजरी होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते दत्तक झाडांचे वाटप केले जाणार आहे. हा उपक्रम येत्या शुक्रवारी (दि. १२) होणार आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता वीर बाजीप्रभू देशपांडे पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत वृक्षदिंडी होईल. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व मंदिर परिसरात वृक्षारोपणाने उपक्रमाचे उद्घाटन होईल. उपक्रमाचे उद्घाटन अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde ), आमदार विनय कोरे, माजी खासदार राजू शेट्टी, न्यायाधीश बी. डी. कदम, केमिस्ट असोसिएशनचे राज्य संघटन सचिव मदन पाटील, मदत फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. विजय गावडे यांच्या हस्ते होईल. ३९१ वृक्षारोपण उपक्रमांतर्गत पन्हाळगडावरील पुसाटी बुरूज मार्ग, पन्हाळा क्बल, बीएसएनएल टॉवर परिसर, काली बुरूज, धान्य कोठार आदी परिसरात विविध प्रकारची औषधी, फळ आणि फुलझाडे लावली जाणार आहेत.

शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्रच्यावतीने गेल्या १० वर्षांपासून कृतिशील शिवजयंतीची परंपरा यंदाही कायम ठेवली असून माहुली किल्ला, ताराराणी समाधीस आर्थिक मदतीचा हात तसेच ‘अपरिचित शिवछत्रपती’ विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER