कोल्हापुरातील पन्हाळगडावर सापडले शिवकालीन तोफगोळे

Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पन्हाळगड आणि पावनगडावर शिवकालीन सुमारे 400 तोफगोळे सापडले. अजून हजारो तोफ गोळे सापडण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. टीम पावनगड संघटनेतर्फे गडावर दिशादर्शक फलक लावत असताना तोफेचे आज दुपारी हे गोळे मिळाले आहेत.

ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावन गडावर हे तोफगोळे सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पावनगडाची निर्मिती केली होती. वनविभाग आणि टीम पावनगड ही संघटना पावन गडावरवर दिशादर्शक फलक लावण्याचे काम करत आहेत. याचवेळी फलकासाठी खड्डा काढत असताना गडावरील महादेव मंदिराशेजारी हे गोळे सापडले. स्थानिकांच्या माहितीनुसार पूर्वीच्याकाळी याठिकाणी दारू गोळ्याचे कोठार होते.

राज्य शासनाने गड किल्ले संवर्धन करताना ज्याठिकाणी ऐतिहासिक वास्तु, पुरावे मिळण्याची शक्यता आहे असे गड किल्ले ताब्यात घेतले पाहिजेत. पुरातत्व विभागाने पावनगड ताब्यात घेऊन तेथे तातडीने उत्खनन करावे. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा, अनमोल वस्तू पुढे येतील. तसेच राष्ट्राच्या संपत्तीचे जतन संवर्धन आणि संरक्षण होईल, अशी दुर्ग प्रेमीतून मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER