शिवसेनेच्या ‘या ‘ खासदाराने करून दाखवले ; युनिसेफकडून (UNICEF) गौरव

Arvind Sawant & UNICEF

मुंबई : ‘युनिसेफ’ (UNICEF) आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंटरियन अवॉर्ड  फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार दक्षिण मुंबईचे शिवसेना (Shivsena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना जाहीर झाला आहे.

सावंत यांना लोकसभेत ‘शिक्षणाचा हक्क’, ‘मुलांवरील अत्याचारांपासून त्यांची सुरक्षा’, ‘कुपोषण आणि बाल आरोग्य’ या संदर्भात चर्चासत्रातील त्यांचा उल्लेखनीय सहभाग आणि लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न, या सर्वांचा विचार करून २०१८-१९ वर्षासाठी उपरोक्त पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. ‘युनिसेफ इंडिया’ने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून त्यांचे जाहीर अभिनंदन करतानाच भारतातील मुलांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांचे हक्क निश्चित केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

तसेच या प्रयत्नांमुळे भारताचे भविष्य संपन्न होईल असा आशावाददेखील व्यक्त केला आहे. सदर संस्था प्रतिवर्षी भारतातील लहान मुलांचे जीवन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणार्‍या खासदारांना पुरस्कार प्रदान करते. शिक्षण क्षेत्रातील विषमता दूर करून समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते सतत आग्रही असतात.

मुलांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. मोखाड्यात कुपोषित मुलांची बातमी येताच डॉक्टरांचे पथक घेऊन ते गेले आणि पुढे ४५० कुपोषित मुलांना दत्तक घेऊन ते सुदृढ होईपर्यंत त्यांना सकस आहार पुरवठा केला. शिक्षण आणि आरोग्यसेवेपासून वंचित मुलांसाठी अरविंद सावंत यांची तळमळ आणि धडपड गत अनेक वर्षे सर्वश्रुत आहे. २५-३० वर्षांपासून ते ठाणे जिल्ह्यातील आदिवासींसोबत दिवाळी साजरी करतात, हे विशेष.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER